सांधण दरी (सांधण व्हॅली)
सह्याद्री च्या प्रेमात असलेला मी. |

सांधण व्हॅली ! सह्याद्री मधली एक खोल दरी, आशिया खंडातील क्रमांक दोनची खोल दरी.अत्यंत सुंदर आणि तितकीच भयाण. सांधण व्हॅली ची खोली फक्त २०० फूट असली, तरीही त्या २०० फूट मध्ये सह्याद्रीचं सौंदर्य ठळकपणे दिसतं ! रतनगड, कळसुबाई शिखर, अलंग मदन कुलंग यांनी वेढा दिलेली अशी ही "valley of shadows" म्हणजे प्रत्येक गिर्यारोहकासाठी अगदी ऑल इन वन पॅकेजच !
नाशिक जवळील भंडारदरा येथील सामरद गावातून सांधण व्हॅली मध्ये जाता येते. सामरदला पोहोचण्यासाठी आम्ही रात्री कसारा ची ट्रेन पकडली. रात्री १.३० वाजता कसाऱ्याला पोहोचलो. यावेळेस चा ट्रेक हा drifters सोबत चा होता, आणि त्यांच्या सोबत मी आधीच अलंग-मदन-कुलंग केल्याने मी काही नवखा नव्हतो. उलट सगळे जुने मित्र जसे भेटले, तशी ट्रेक ची उत्सुकता १०० पटीने वाढली! कसाऱ्याहून आम्ही गाडी मध्ये बसलो, आणि सामरद गावाकडे निघालो. वाटेत चहा पिण्यासाठी थांबलो, तेव्हा प्रत्येकानी आपापली ओळख करून दिली. जवळपास ५ वाजेपर्यंत आम्ही सामरद गावात पोहोचलो, आणि नाश्ता केला. सकाळच्या प्रहरात सगळेच थंडीने कुडकुडत होते, आणि नुकताच चुलीवरून काढलेला चहा सुद्धा २ मिनिटात थंड होत होता. पोहे खाऊन, चहा पित सगळे टवाळक्या करत होते. ज्यावेळेस ट्रेक सुरु व्हायच्या आधीच ट्रेक ची मजा यायला लागते, तेव्हा समजून जायचं की आपण अगदी योग्य लोकांसोबत योग्य ठिकाणी आलो आहोत. सामरद गावापासून पुढे जवळपास १५ किमी वरून सांधण व्हॅली ची सुरुवात होते. साधारण ६.३० च्या आसपास आम्ही ट्रेक ला सुरुवात केली.
नाशिक जवळील भंडारदरा येथील सामरद गावातून सांधण व्हॅली मध्ये जाता येते. सामरदला पोहोचण्यासाठी आम्ही रात्री कसारा ची ट्रेन पकडली. रात्री १.३० वाजता कसाऱ्याला पोहोचलो. यावेळेस चा ट्रेक हा drifters सोबत चा होता, आणि त्यांच्या सोबत मी आधीच अलंग-मदन-कुलंग केल्याने मी काही नवखा नव्हतो. उलट सगळे जुने मित्र जसे भेटले, तशी ट्रेक ची उत्सुकता १०० पटीने वाढली! कसाऱ्याहून आम्ही गाडी मध्ये बसलो, आणि सामरद गावाकडे निघालो. वाटेत चहा पिण्यासाठी थांबलो, तेव्हा प्रत्येकानी आपापली ओळख करून दिली. जवळपास ५ वाजेपर्यंत आम्ही सामरद गावात पोहोचलो, आणि नाश्ता केला. सकाळच्या प्रहरात सगळेच थंडीने कुडकुडत होते, आणि नुकताच चुलीवरून काढलेला चहा सुद्धा २ मिनिटात थंड होत होता. पोहे खाऊन, चहा पित सगळे टवाळक्या करत होते. ज्यावेळेस ट्रेक सुरु व्हायच्या आधीच ट्रेक ची मजा यायला लागते, तेव्हा समजून जायचं की आपण अगदी योग्य लोकांसोबत योग्य ठिकाणी आलो आहोत. सामरद गावापासून पुढे जवळपास १५ किमी वरून सांधण व्हॅली ची सुरुवात होते. साधारण ६.३० च्या आसपास आम्ही ट्रेक ला सुरुवात केली.
![]() |
अखंड दगडांची वाट |
सांधण व्हॅली ची गम्मत म्हणजे माझ्या मते हा सह्याद्री मधला एकमेव ट्रेक आहे जो पूर्ण करण्यासाठी चढावं नाही लागत, उतरावं लागतं . सांधण व्हॅली मध्ये पूर्ण उतरण्यासाठी फक्त २ किमी चा रस्ता आहे. ऐकायला सोपं आहे, पण उतरताना तितकाच कठीण. व्हॅली मध्ये जर तुम्ही पायवाट वगैरे शोधायला गेलात तर तुमचा अख्खा दिवस तसाच वाया जाईल, कारण पायवाट, रस्ता हे सगळं इकडे फोल आहे. एकावर एक अश्या असंख्य खडकांनी बनलेली ही दरी, रस्त्यात हरवायची भीती नसली, तरी आपलं भान मात्र नक्की हरवतं . भल्या मोट्ठ्या दगडांवरून उड्या मारत, घसरत, सावकाश पाय टाकून पुढे जात असताना आपल्याला आपल्या अश्मयुगीन पूर्वजांची आठवण येते.
पाण्याच्या वाटेस जवळपास पुढचा १-१.३० तास फक्त दगडांची वाट आहे. इकडून तिकडून उड्या मारत फक्त खाली उतरत राहायचं . दरीत उतरत असल्याने अनेक वेळा उतरताना तोल जाण्याची भीती असते, आणि उतरताना समोरून खोल घळई मधून अनेक मनमोहक आणि काळजाचा ठोका चुकवणारी द्रुश्य आहेत. एक क्षण तर असं वाटतं की सगळं सोडून इकडेच शांतता आणि निसर्गाच्या सुंदरतेचा आस्वाद घेत पडून राहावं . दगडांच्या वाटेवरून चालून चालून पाय दुखायला लागले की मग एका मागोमाग एक rappelling चे patches येतात. एकूण ४ rappelling patches आहेत, ज्यातला पहिला ८० फुटांचा आहे, आणि बाकीचे अगदीच छोटे, ३०-४० फुटांचे आहेत. पण त्याची लांबी किंवा उंची याने अजिबात फरक नाही पडत, कारण प्रत्यके वेळेस भीती हि तेवढीच वाटते. दगडाच्या वाटेवर चालून पाय दुखतात, आणि rappelling ला दोरी पकडून हात!
Rappelling आणि माझा ३६ चा आकडा आहे हे मला त्याच दिवशी कळलं. मी ह्या आधी सुद्धा rappelling केलंय, पण काय माहित का नेमका ह्या वेळचा माझा अनुभव हा बाकी सगळ्यांसपेक्षा वेगळा होता! मला एक खात्री नक्की होती की मी पडणार नाही, मी संपूर्ण सुरक्षित आहे. मी तयारीत सुरुवात केली, वरून मित्रांना आवाज दिला "व्हिडीओ काढ रे" आणि पहिले २० फूट अगदी यशस्वीपणे खाली उतरलो. नंतर मी एकदा खाली वजन टाकलं , तशी माझ्या शरीराने एक जोरात गिरकी घेतली आणि मी ढेपाळलो. इकडून तिकडे झोपाळा घेत असल्यासारखं हलत होतो. एका ठिकाणी तर माझ्या वजनदार बॅगेमुळे मी एका कपारीत अडकून बसलो, आणि मला हलताच येईना! ह्या सगळ्या धुमश्चक्री मध्ये माझं कोपर फुटलं . कसाबसा खाली आलो आणि मोकळा श्वास घेतला. Rappelling ची ती २ मिनिटं मी कधीच नाही विसरणार.
आणखी एक गम्मत अशी, की ट्रेक च्या दरम्यान झालेल्या इतर किरकोळ जखमा आपल्याला कश्या झाल्या? हा प्रश्न मला अनेकदा पडतो. सगळं अगदी सुरळीत चालू असताना अचानक पायाला झोंबायला लागतं; आणि मग कळतं की अरे आपल्याला तर जखम झाली आहे, आणि तिकडून रक्त वाहतंय. असं माझ्या सोबत अनेकदा झालयं, आणि ह्यावेळेस सुद्धा त्याला अपवाद नाही. गुडघा, दंड, पायाची नळी यावर झालेल्या जखमा ह्या कधी आणि कश्या झाल्या हा विचार करणं कधीच सोडून दिलंय .

तिसरा आणि चौथा patch पार करायच्या २ वाट होत्या. एक तर rappelling , आणि दुसरा म्हणजे दोरीने पकडून खाली उतरायचं . माझ्या नुकत्याच आलेल्या rappelling च्या अत्यंत छान अनुभवामुळे मी दोरी पकडून उतरायचं ठरवलं. ३ दगडांनी तयार झालेल्या फटींमध्ये एक दोरी सोडली होती आणि त्या दोरी च्या जीवावर आपल्याला खाली उतरायचं होतं . Rappelling ने दोन्ही patches उतरायला सोपे होतात. चौथा patch म्हणजे पूर्ण धमाल आणि बिन-तिकिटाचा शो होता. तिथेही तसंच, एक rappelling चा रस्ता आणि एक दोरीचा. त्या दिवशी मला प्रचिती आली कि खाज ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला अनेकदा अडचणीत आणते. मी दोरी पकडून उतरायला लागलो. दोरी पकडून हात दुखायला लागला, आणि मी जमिनीपेक्षा जवळपास १२-१५ फूट वर असताना दोरी सोडली, आणि खाली येऊन आपटलो. दोरी हाताला घासल्याने हात प्रचंड झोंबत होते. एकूणच, अवस्था खराब होती. मी सगळ्यात पहिले उतरलो होतो म्हणून मग मी मस्त बॅग टाकून त्यावर आडवा पडून इतरांची मजा बघत होतो. मला स्वतःला लागलेलं असल्याने मी कोणाला मदत करायला नाही गेलो, कारण जर मी स्वतःला नाही सांभाळू शकलो, तर इतरांना कसा सांभाळेन?
४.३० च्या आसपास आमचे सगळे rappelling patches संपले होते, ट्रेक जवळपास पूर्ण झाला होता. एक अगदी छोटी पाण्याची वाट पार केली की मग पुढे चालत जाऊन कॅम्पिंग च्या जागेवर बॅग टाकून मनसोक्त झोपायचं , हे एकच ध्येय मी सध्या मनाशी बाळगलं होतं . कारण दिवसच तितका थकवणारा होता!
![]() |
कॅम्पिंग पॉईंट. |
दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आवरा आवरी झाली, नाश्ता करून सगळे फोटो काढण्यात मग्न झाले.
सांधण वरून परत येण्याचे २ वेगळे रस्ते आहेत. एक करोळी घाटातून जो तुम्हाला पुन्हा सामरद गावात नेऊन सोडतो, आणि दुसऱ्या आसनगाव जवळील देहणे गावात नेऊन सोडतो. परत सामरदला जायला ५ तास लागतात तर देहणे गाव फक्त २ तासांवर आहे. आम्ही १० वाजता चालायला सुरुवात केली आणि १२ वाजेपर्यंत खाली पोहोचलो सुद्धा! आमच्या साठी गाड्या आधीपासूनच तयार होत्या. आम्ही गाडीत पटापट बॅग टाकल्या आणि आसनगाव साठी निघालो. ठाण्याला पोहोचून आमच्या परंपरे प्रमाणे आम्ही मित्रामित्रांनी मिसळ खाल्ली आणि घरी गेलो.
Drifters सोबत असल्याने कसलीच चिंता नव्हती. सगळे लोक ओळखीचे होते. एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येकाला refreshment साठी पॅकेट्स दिले जातात. त्यांची मॅनेजमेण्ट, गावातल्या लोकांशी असलेले सलोख्याचे संबंध हे सगळंच कौतुकास्पद आहे. सांधणचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी Drifters चा खूप आभारी आहे!
Difficulty level - Medium to Hard
Recommended season - Winter.
Comments
Post a Comment